उत्तर महाराष्ट्र

शेवटच्या दिवशी 96 उमेदवारांची माघार 

सकाळन्यूजनेटवर्क

शेवटच्या दिवशी 96 उमेदवारांची माघार 


जळगावः महापालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी "अपक्ष' तसेच राजकीय पक्षांच्या अशा 96 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र, माघारीसाठी समोरच्या उमेदवारांकडून "अपक्ष' 
व राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून त्या उमेदवारांची मनधरणी ते माघार होण्यापर्यंत कार्यकर्त्यांची खूपच धावपळ उडाली. अक्षरशः शेवटच्या मिनिटापर्यंत ही धावपळ दिसून आली. 
महापालिका निवडणुकींतर्गत 19 प्रभागांतील 75 जागांसाठी एकूण 615 उमेदवारांचे अर्ज महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. छाननीअंती 427 अर्ज वैध ठरून माघारीसाठी आज (17 जुलै) शेवटची मुदत होती. शनिवार ते सोमवारपर्यंत 28 जणांनी अर्ज मागे घेतले, तर आज शेवटच्या दिवशी 96 जणांनी अर्ज माघार घेतले. यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, हिदू महासभा तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. 

माघारीसाठी उमेदवाराची मनधरणी 
प्रभागात "अपक्ष' तसेच पक्षाच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार फिल्डिंग सुरू होती. आज सकाळपासूनच काही उमेदवारांना माघार घेण्यासाठी संबंधितांची मनधरणी करून अनेक जणांनी उमेदवारी मागे घेतली. 

विद्यमान नगरसेवकांचीही माघार 
विद्यमान नगरसेवकांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी "अपक्ष' म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात भाजपच्या कंचन बालाणी, "खाविआ'चे इक्‍बालोद्दीन पिरजादे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेतली. 

"अपक्षा'साठी शिवसेनेची माघार 
शिवसेनेकडून व "अपक्ष' असे लिना पवार यांनी प्रभाग क्र. 11 "ब'मधून अर्ज दाखल केला होता. परंतु "एबी फॉर्म'मधील चुकीमुळे श्रीमती पवार यांचा शिवसेनेचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांच्या जागी शिवसेनेच्या हर्षाली वराडे उभ्या होत्या. परंतु "अपक्ष' म्हणून लिना पवार यांच्यासाठी शिवसेनेच्या हर्षाली वराडे यांनी 
काही मिनिटे बाकी असताना माघार घेतली. 

जयश्री पाटील यांचा राजीनामा 
भाजपच्या विद्यमान नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी आज महापालिका आयुक्तांकडे आपला राजीनामा दिला. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने श्रीमती पाटील प्रभाग क्र. 7 "ड' मधून "अपक्ष' म्हणून रिंगणात आहेत. शिवसेनेने श्रीमती पाटील यांना पुरस्कृत केल्याने त्यांनी आज महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे राजीनामा दिला. 

(चौकट) 
पक्षनिहाय अर्ज माघारीची संख्या 

पक्ष संख्या 
शिवसेना........1 
राष्ट्रवादी.........2 
कॉंग्रेस..........1 
हिंदू महासभा....1 
अपक्ष............119 
एकूण....124 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT